maraathi blog vishva

Friday, March 23, 2012

" virus"

" virus"

out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही
... संवेदनांना ' virus' लागलाय दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं range नसलेया mobile सारखे

hang झालेल्या PC सारखी मातीची स्थिती वाईट
नाती माती जोडणारी कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली पिढी भलतीच ' cute'
contact list वाढत गेली संवाद झाले mute

computer च्या chip सारखा माणूस मनानं खुजा झालाय
अन ' mother' नावाचा board, त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा internet वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही आता लागते facebook
.......................

Tuesday, August 24, 2010

आयुर्वेद म्हणजे काय?

आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. त्याची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी ब्रम्हाद्वारे झाली व इन्द्रामार्फत भरद्वाज व पुनर्वसू आत्रेय या महर्शिनि तो प्रुथ्विवर आणला. नन्तर या महर्शिनि आपल्या शिश्यान्मार्फात आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केला. अशा स्वरुपात आयुर्वेद याच सिश्यान्नि रचलेल्या ग्रन्थ सम्पदेच्या माध्यमातून आपल्यासमोर उभा आहे. तो आपण जाणून घेवुया.
आयुर्वेद या शब्दाची फोड केल्यास आयुश: वेद: अयुर्वेद:! अशी होते. म्हणजॅच जॅ शास्त्र आपल्याला आयुश्याविशयी विद म्हणजॅ माहिती देते ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. रोगी व्यक्तीच्या रोगाचे निवारण करणे व सोबत स्वस्थ व्यक्तिन्च्या स्वास्थ्याचे रक्शण करणे हे आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे. त्यामुळेच आयुर्वेद केवळ रोगनिवारणाचे शास्त्र नाही तर सम्पूर्ण आरोग्याचे शास्त्र आहे. हे शास्त्र इतके परिपूर्ण आहे की या शास्त्राच्या सिद्धान्तान्मध्ये कालानुरुप कधीही बदल करावा लागला नाही. हजारो वर्शान्पूर्वी जी औशधे वेगवेगळ्या आजारान्वर काम करीत होती तीच आजही काम करतात. हे आयुर्वेदाचे वैशिश्त्य आहे. आयुर्वेद हे केवळ जुन्या आजारान्वरच काम करते असे नाही तर अगदी एका दिवसाच्या ठन्डी, ताप, सर्दी, यासारख्या किरकोळ आजारान्मध्येही आयुर्वेदाची औशधे प्रभावीपणे व तात्काळ काम करतात. याचा रुग्नाने प्रत्यक्श अनुभव घेण्यासाठी स्वत: आयुर्वेदाचा आग्रह धरायला हवा.
सौर्न्द्यासाठीची उत्पादने च्यवनप्राशसारखे आरोग्यदायी कल्प-औशधे आज सर्वसामान्यान्च्या मुखामध्ये आहेत.यासाठी आयुर्वेदाला कोणीही स्पर्धक नाही. परन्तु इतरही अनेक व्याधी जसे वातव्याधी, त्वचारोग, मधुमेह, दमा-श्वसनाचे विकार, पचनाचे विकार, मुळव्याध, वन्ध्यत्व, अगदी कन्सर एड्ससारखे सर्व विकार आयुर्वेदाच्या उपचार कक्षात येतात. या सर्व व्याधींचे निदान व उपचार करण्यात आयुर्वेद स्वयंपूर्ण आहे. पंचकर्म व औशधांच्या माध्यमातून या व्याधींवर उपचार करता येतात. पंचकर्म-पंचशोधन उपक्रम हीच आयुर्वेदाची खरी ओळख आहे. शरिरातील दोश शरिरात दाबून टाकण्यापेक्शा पंचकर्माच्या साहाय्याने ती शरिराबाहेर काढून टाकणे व पुन्हा पथ्य पाळून औशधांचा नाद सोडणे हे पंचकर्माचे वैशिश्ट्य आहे.
आयुर्वेदाचे प्रस्थापित रूप आता बदलले आहे. केवळ झाडपाल्याची महाग औशधे म्हणून आयुर्वेदाची ओळख न राहता शास्त्रशुद्ध पंचकर्मयुक्त आयुर्वेदाच्या प्रसाराला सुरूवात झाली आहे. आयुर्वेद हे संपूर्णत: स्वदेशी तंत्र आहे व प्रत्येक भारतीयाने आपल्याला जडलेल्या व्याधिंसाठी प्राधान्याने आयुर्वेदाचा अंगिकार करायला हवा. हा हट्ट रुग्णानेच धरावा.
वैद्य विकास तान्हाजी करंजेकर, संगमनेर, मो 9860130392.

Thursday, August 12, 2010

मराठी अस्मिता जपावी जरूर.

तमिल लोक स्वताची अस्मिता जपतात तेव्हा टिका होत नाही। कन्नड़ लोक स्वताची संस्कृति जपतात तेव्हा टिका होत नाही। गुजराती मुख्यमंत्री गुजराती अस्मितेवर बोलतात तेथेही टिका होत नाही। मग महाराष्ट्रातील akhaade राज thaakare जेव्हा मराठी अस्मिते बद्दल बोलतात तेव्हाच सगल्यांच्या पोटात कसे दुखते? स्वताच्या भाषेची अस्मिता जपन्यात गैर काहीच नाही। प्रश्न आहे तो अन्य भाषिकान्वर टीका न करण्याचा.॥
मराठी अस्मिता जरूर जपावी परन्तु इतर भाषिकान्चाही द्वेष करता कामा नये। देशाप्रेमा सोबत जर भाषिक अस्मिता असेल तर ते सर्वात चांगले। राज ठाकरे यांनी याचा विचार जरूर करावा.
जय हिंद।
जय महाराष्ट्र.

DR. KARANJEKAR AYURVED: मराठी मानसा जागा हो!

DR. KARANJEKAR AYURVED: मराठी मानसा जागा हो!: "मराठी मानसा जागा हो, जगाचा राजा हो। तू आहेस चात्रपतिंचा वारस, तुज्यात आहे ईमान आणि धाडस। त्याला आकार दे, जीवनको साकार दे। विसर आलस सगला, काम..."

Monday, August 9, 2010

मराठी मानसा जागा हो!

मराठी मानसा जागा हो,
जगाचा राजा हो।
तू आहेस चात्रपतिंचा वारस,
तुज्यात आहे ईमान आणि धाडस।
त्याला आकार दे,
जीवनको साकार दे।
विसर आलस सगला,
कामाचा आनंद खरोखर वेगला।
काम कर हुशारीने १२-१४ तास,
यश आले की म्हणशील त्यात कसला आलाय त्रास।
परप्रान्तियान्ना आपलेसे कर त्यांना डोक्यावर चढवू नकोस,
पण यशाची पायरी चधनार्या आपल्या मित्राचे पाय ओढु नकोस।
मित्राच्या यशावर जलु नकोस त्याला दाद दे,
त्याच्या दुखातही त्याला साथ दे।
गलिच्छ राजकारानातुं बाहेर ये,
व्यापार उद्योगात भरारी घे।
उभे कर स्वताचे साम्राज्य ,
कदाचित सुर्यावारही करशील तू राज्य.